वंजारी ही महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील एक जात आहे. महाराष्ट्रात वंजारी समाज भटक्या जमाती-(ड) (NT-D) मधे वर्गीकृत आहे. इसवी सनाच्या १५-१६ व्या शतकात राजस्तान मधून दक्षिणेकडे स्थलांतरित झाले विविध ३० (तीस) क्षत्रिय जाती-जामाती पैकी ही एक जात होय. हा समाज ईशान्य भारत सोडून भारतातील सर्वच राज्यांत कमी जास्त लोकसंख्येत आढळतो. भारतातील एक प्रमुख क्षत्रिय भटका समाज आहे
भारतात विविध राजांत सर्व समाजांसोबत मिळून मिसळून राहणारा हा शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, पशुपालक समाज उपेक्षित राहिल्याने प्रगती थांबलेला समाज आहे. जाती व्यवस्थेचे चटके इतर क्षत्रिय समाजापेक्षा सर्वात जास्त सोसलेला हा समाज आहे. राजकीय आणि शैक्षणिक आरक्षण मिळाल्याने आज उभारत असलेला हा भारतीय समाज इतर क्षत्रिय समाजाकडून क्षत्रिय असूनही मान न मिळालेला समाज आहे. महाराष्ट्र राज्य बाहेरील वंजारी समाजाला तेथिल भाषेतील विविधते मुळे वंजारा,वंजरी संबोधले जाते. वंजारी समाज हा महाराष्ट्र राज्य सोबत जवळ जवळ संपूर्ण भारतात आढळतो.
इतिहास
वंजारी समाजाचा त्यागाचा व पराक्रमाचा इतिहास आहे. वंजारी समाज हा क्षत्रिय वंश असलेला पण देशोदेशी भटकंती करणारा बलशाली व कडवट लढाऊ गट आहे. आग्र्याला जाताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या औरंगजेब भेटी वेळी व प्रतापगडावर अफझलखान भेटी वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सोबत निवडक लोकांमध्ये वंजारी लोक निवडण्याचे कारणही तेच आहे. राष्ट्रमाता जिजाबाईच्या माहेरगावी सिंदखेड राजा परिसरातील हजारो वंजारी तरुण मावळे शिवाजी महाराज यांच्या सैन्यात भरती झाले होते. तसेच राजस्थानात महाराणा प्रताप जेव्हा दिल्लीच्या पातशहा सोबत एकाकी लढत होते तेव्हा वंजारी समाज तेथे आपला पराक्रमाचा इतिहास उभारत होता. महाराणा प्रताप यांचे प्रमुख सरदार मल्ला व फत्ता वंजारी हे निष्ठेने लढत होते. त्यांच्या समाध्या उदयपूरच्या किल्ल्यात आजही उभ्या आहेत. वंजारी लोकांच्या साहाय्याने महाराणी दुर्गावती १० लाख बैल वापरून भारतातील विविध राजांना दारुगोळाउ शस्त्रसाठा, मीठ मसाला व अन्नधान्य यांचा पुरवठा करत असे.
राजस्थानात असतांना हा समाज कडवा लढवय्या क्षत्रिय म्हणून ओळखला जात होता. आजही राजस्थानात हा समाज मोठ्या प्रमाणात आढळून येतो. यवन आक्रमणांमुळे त्रस्त होऊन दक्षिणे कडे स्थलांतरित झाला. आणि व्यापार उदीम करू लागला. दळणवळण साधनांचा शोध लागण्यापूर्वी पुरातन काळापासून मालवाहतुक/मालपुरवठा करण्याचे काम वंजारी समाज करत असे. फिरता व्यापार करणारे म्हणजे वण-चारी...याचेच रुपांतर "वंजारी" या शब्दात झाले असे मानले जाते. या आद्य मालवाहतुकदारांचा...मालपुरवठादारांचा इतिहास पुरातन तर आहेच पण मानवी जीवनाला तेवढाच उपकारक ठरलेला आहे. पूर्वीच्या काळी वंजारी समाज मालवाहतूकीसह व्यापारही करत असे.
आजचे घाट, रस्ते हे मुळच्या वंजारी मार्गांवरच बनले आहेत. या मार्गांवरुन एकेक वंजारी कुटुंब शेकडो बैलांचे तांडे घेऊन देशभर मालवाहतूक करत असत. वाटेत चोर-दरोडेखोरांच्या धाडी पडण्याच्या घटना नित्य असल्याने प्रतिकारासाठी मुळचाच क्षत्रिय लढवय्या वंजारी समाज सज्ज होता. मूळ व्यवसायच भटक्या स्वरूपाचा असल्याने आणि विविध जाती-जमातींशी, अगदी परकीय व्यापाऱ्यांशीही नित्य संपर्क येत असल्याने वंजाऱ्यांची एक स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती बनत गेली. इतर कोणत्याही समाजापासून वेगळे पडल्याने एक स्वतंत्र मानसिकता...भटकेपणाची नैसर्गिक ऊर्मी यांतून त्यांचे स्वत:चे संगीत...काव्यही उमलत गेले. भाषाही वेगळी बनत गेली. हे सारे नैसर्गिक व स्वाभाविक असेच होते. वंजारी तांड्यांचे आकर्षण तत्कालीन कवी/नाटककारांमध्येही होते. दंडीने त्याच्या दशकुमारचरितात तांड्यांच्या एका थांब्याचे व रात्रीच्या त्यांच्या आनंदी गीतांचे/नृत्यांचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे.
वंजारी समाजाचे कार्य फक्त नागरी व व्यापाऱ्यांसाठीचा मालपुरवठा करणे एवढेच नव्हे तर युद्धकाळात सैन्यासाठी अन्नधान्याचा पुरवठा करणे हे कामही वंजारी समाज पुरातन कालापासून करत आला आहे. युद्धजन्य परिस्थितीत वंजारी समाजाचे योगदान वाढत गेले. सैन्याचे तळ एकेका ठिकाणी दीर्घकाळ असल्यास वंजारी शाश्वत अन्नधान्य पुरवठा अव्याहतपणे करत असत. हा समाज कोणत्या अशा विशिष्ट बाजूसाठीच पुरवठा करत नसल्याने व तटस्थ असल्याने वंजाऱ्यांवर कोणताही पक्ष बळजबरी करत नसे वा हल्ले करुन त्यांची लुटमारही करत नसे. कारण म्हणजे त्यांच्या अस्तित्वाखेरीज युद्धे लढता येणे अशक्य आहे याची जाणीव सर्वांनाच असे. सैन्याला अन्नधान्य पुरवठा करण्याचे काम अगदी ब्रिटिशकाळापर्यंत सुरू होते. चेउल येथील बंदरात हजारो बैलांचे वंजारी तांडे येत असत, याची नोंद कोलाबा गॅझेटियरने केलेली आहे. अनेक वंजारीना मोगलांनी वतने दिली असल्याच्याही नोंदी मिळतात.
थोडक्यात अठराव्या शतकापर्यंत मालवाहतूक, फिरता व्यापार यात वंजारी समाजाचे प्राबल्य होते. परंतु ब्रिटिशकाळात रस्ते बनू लागले. औद्योगिक क्रांतीमुळे वाहतुकीची आधुनिक साधने आली व वाहतुकीचा वेगही वाढला. रेल्वेने तर पुरती क्रांतीच घडवली. बैलांच्या पाठीवर सामान लादून भ्रमंती करणारा वंजारी समाज दूर फेकला जाऊ लागला. त्याची गरजच संपुष्टात आली. चार-पाच हजार वर्ष अव्याहतपणे भटकत राहून व्यवसाय करणारा समाज यामुळे एका विचित्र वळणावर आला. स्थिर होणे भाग पडले. ही सक्तीची स्थिरता होती. काही शेतीकडे वळाले, तर काही मोलमजुरीकडे.
वंशज:
अनेक वंजारी स्वत:ला राजपूत कुळीतील राणाप्रतापाचे वंशज समजतात. राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते मुसलमानांबरोबर दक्षिणेस आले असावेत असेही मानले जाते. त्यांच्यात अनेक उपजमांतीचे लोक आहेत. बिहार व ओरिसा या राज्यांत त्यांना आदिवासी म्हणून मान्यता मिळाली नाही. इतरत्र त्यांना अनुसूचित जमातींत समाविष्ट केले आहे. तर महाराष्ट्र्र राज्यात त्यांना भटक्या विमुक्त जातीचा दर्जा दिलेला आहे. आंध्र प्रदेशात ते सुगाळी, दिल्लीत शिरकिवन, राजस्थान व केरळात गवरिया व गूजरातमध्ये चारण म्हणून ओळखले जातात. लोदी घराण्यातील सिकंदरशाह याने १५०२ मध्ये धोलपूरवर स्वारी केली, तेव्हा वंजारी बंजारांचा प्रथम उल्लेख केलेला आढळतो. थोडक्यात विविध प्रांतीय लोक असल्याने सर्व पोटभेद पडले असले तरी समस्या समान आहेत. वंजारी समाजही पुरातन काळी मातृसत्ताक पद्धती पाळनाराच होता. महाराष्ट्रातील वंजा-यांची श्रद्धास्थाने म्हणजे जेजुरीचा खंडोबा आणि रेणुका माता, माहूरगड हे होत. वंजारी समाजाची उत्पत्ती ही रेणुका मातेच्या सन्तानीं पासून झाली असे मानल्या जाते. रेणुका मात आणि जमदग्नी ऋषी यांना पाच पुत्र होते, ते अनुक्रमे असे, १) वशूमंत २) वस्तू ३) सूशौन ४) विश्ववस्तू. ५) परशूराम हे होत. वशुमंतापासून कमण्डूक ऋषी. त्याच्यापासून अनुक्रमे १)रघुपती, २)अधिपती, ३)कानुपती आणि ४)सुभानुपती हे जन्मले. यातील रघुपती पासून १)रावजीन, अधिपती पासून २)लाडजीन, कानिपती पासून ३)मथुरजन आणि सुभानुपती पासून ४)भूसार्जीन अशा क्रमवार चार शाखांची उत्पत्ती झाली.आज या चारही शाखा एक आहे व वंजारी म्हणून परिचित आहे.
उर्वरित माहिती पुढील ब्लॉग मधे...
ReplyDeleteया ब्लॉग चा उद्देश हा समाजातील युवा वर्गाला वंजारी समाजाचा इतिहास कळवा हा आहे
ReplyDelete